उमेदवारांनी “ट्रू व्होटर’ ऍप वापरावे – तहसीलदार किरण जमदाडे यांचे आवाहन

वडूज (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपल्या स्मार्टफोन्सवर “ट्रू व्होटर’ ऍप डाउनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. उमेदवारांनी माहिती आणि दैनंदिन खर्च दररोज या ऍपमध्ये ऑनलाइन भरायचा आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे.

त्यासाठी आवश्‍यक ती माहिती निवडणूक यंत्रणेला वेळोवेळी द्यावी लागणार आहे. उमेदवारांनी लेखी माहिती देण्याबरोबरच या ऍपच्या माध्यमातून ऑनलाइन भरणेसुद्धा बंधनकारक आहे, असे जमदाडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.