पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यावर्षीदेखील 11 ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये विचार प्रबोधन पर्वामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांसाठी नागरिक आणि विविध संघटनांनी कार्यक्रम आयोजनासंदर्भातील सूचना लेखी स्वरुपात 5 मार्च रोजी सायंकाळी पिंपरी येथील महापालिका मुख्यालयातील माहिती व जनसंपर्क विभागात प्रत्यक्ष सादर कराव्यात. अथवा िीेलिालळपवळर.र्सेीं.ळप या मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.