पिंपरी, (प्रतिनिधी) – मोटारीला साईट न दिल्याच्या किरकोळ कारणावरुन व्यावसायिकाला टोळक्याने बेदम माराहाण करुन लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. १) रात्री अकराच्या सुमारास बैंगलोर-मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्यावर ताथवडे येथे घडली. याबाबत कुणाल सुनिल भुजबळ (वय २२, रा. लेगन्सी बिल्डींग, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अक्षय सुदाम सुतार (वय २४, रा. नांदे, म्हाळुंगे, ता. मुळशी), विजय अशोक जाधव (वय २४, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी), दिपक सुनिल कड (वय २३, रा. कडनगर, उंद्री), स्वप्निल लक्ष्मण खांडवे (वय २३, रा. पिंपळाची तालीम, म्हाळुंगे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे दुकान बंद करुन घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी मोटारीला साईट दिली नाही, या कारणावरून फिर्यादीला बेदम मारहाण केली, तसेच मोटारीवर दगड मारुन मोटारीचे नुकसान केले. फिर्यादीच्या गळ्यातील ८० हजार किमतीची सोन्याची चैन व २० हजार रुपये रोख रक्कम हिसकावून नेली. याबाबत फिर्यादीने पोलिसांना कळवले असता, पोलिसांनी आरोपींना अटक केली