खालापूर, (वार्ताहर) – संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन झोन खरसई रायगड ४० अ अंतर्गत शाखा-मार्केवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे शंभर जणांनी रक्तदान केले.
रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान कर्जत येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे हे शिबिर घेण्यात आले. या वेळी नगरसेवक संकेत भासे, शांताराम लदगे, सेवादल अधिकारी प्रकाश मार्के, महिला अधिकारी करुणा धारणे, शिक्षक – शिक्षिका व मार्केवाडी युनिट सेवादल आदी संत निरंकारी मिशनचे अनुयायी उपस्थित होते. रक्त संकलन शासकीय रक्तपेढी आलिबाग – रायगड यांनी केले. शिबिरात सुमारे शंभर जणांनी रक्तदान केले.
संत निरंकारी मंडळाचा रक्तदानाचा हा सामाजिक पैलू मनुष्य मात्राच्या मनामध्ये मानवतावादी भावनांना उद्योन्मुख करत आहे. तरी रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहण्यासाठी प्रचार करण्यात आला, असे मुखी मार्केवाडी शाखेचे शांताराम लदगे यांनी सांगितले.