मुंबई – बॉलिवूडचा बॉक्स ऑफिस किंग सलमान खान या वर्षाच्या अखेरीस त्याचा पुढचा चित्रपट ‘किसी का भाई किसी का जान’ घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला होता आणि तो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाचा पारा चढला होता. आता लोक या चित्रपटाच्या टीझर-ट्रेलरकडे टक लावून पाहत आहेत.
दरम्यान, अश्यातच या चित्रपटातील नवीन ‘यनतम्मा’ या गाण्याचा टिझर रिलीज करण्यात आला असून, लवकरच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सलमान खानाने गाण्याचा टिझर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
विशेष म्हणजे या गाण्यावर सलमान खान याचा जबरदस्त लूक दिसतोय. सलमान खान या गाण्यामध्ये लुंगी लूकमध्ये दिसत आहे. सलमान खान याच्या या गाण्याचा टिझर पाहून चाहत्यांमधील उत्साह अजून वाढलाय. सध्या त्याचा हा लूक सगळीकडे व्हायरल होत आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट एप्रिल 2023 मध्ये ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात सलमान खान काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटात कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.