पुणे – ‘झोप’ या शब्दाचे नाव घेतले कि काही लोकांना लगेच आनंद होतो. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी झोप हि अत्यंत आवश्यक आहे. काही लोक अगदी तासंतास झोपत असतात. तर काही लोकांची ‘मला झोपच येत नाही’ अशी समस्या असते.
कितीही थकून भागून घरी आले तरी अनेक लोकांना शांतपणे झोपच लागत नाही. परंतु आता काळजी करू नका. शांतपणे झोप येण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दलची माहिती…
1) शांत झोप लागण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि उत्तम उपाय म्हणजे झोपण्याच्या वेळेचे अचूक नियोजन. आपल्याला साधारणतः किती वाजता झोप येते आणि आपली झोप किती वाजता पूर्ण होते हे ठरवून घ्या. यामुळे तुम्हाला शांत झोप येईल.
2) आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आणि सामाजिक आयुष्यातील गोष्टींचा जास्तीचा ताण घेऊ नका. जर तुम्ही तणावात असाल तर तुम्हाला शांत झोप लागणार नाही.
3) शांत झोप लागण्यासाठी रात्री झोपताना कपभर कोमट दुधात एक चमचा मध घालून प्या.
4) रोज रात्रीचे जेवण झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास पायी फिरणे फायदेशीर आहे. यामुळे तुमची पचनशक्ती उत्तम राहते आणि तुम्हाला झोप लागण्यास मदत होते.
5) रात्रीच्या जेवणात तेलकट, आंबट पदार्थांचा समावेश टाळा. रात्री थोडे कमी जेवण करा. म्हणजे जळजळ होणार नाही आणि झोप उत्तम येईल.
6) रात्री झोपताना डोक्याला हलक्या हातांनी मालिश करा ज्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताभिसरण उत्तम राहील आणि तुम्हाला शांत झोप लागेल.
7) झोपताना तुमच्या तळपायाला नारळाच्या तेलाने मालिश करा.असे केल्याने तुम्हाला उत्तम झोप येईल.
8) झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास तुमच्या आवडीचे पुस्तक वाचा. असे केल्याने तुम्हाला शांत झोप लागेल.