नवी दिल्ली – प्रत्येक देशातील सरकार दरवर्षी आपला अर्थसंकल्प सादर करत असते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन चौथ्यांदा 1 फेब्रुवारी 2022 रोजी भारताचा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. करोनामुळे आधीच हैराण झालेल्या जनतेला या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकार सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प म्हंटल कि चटकन आपल्या डोळ्यांसमोर अर्थमंत्र्याच्या हातातील ब्रिफकेस येते. ब्रिटिश काळापासून या ब्रिफकेसची परंपरा चालत आली आहे. मात्र, 2020 पासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढत लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात केली.
लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आणलेला अर्थसंकल्प बघून निर्मला सीतारामन यांना अनेक प्रश्नोत्तरांचा सामना करावा लागला होता. ‘ब्रीफकेस किंवा सुटकेस ही इंग्रजांची देणं असून, मला ब्रीफकेस पसंत नसल्याचे सीतारामन यांनी यावेळी सांगितले. अर्थमंत्र्यांनी आणलेल्या या लाल चोपडीवर सोनेरी रंगाचे अशोक चिन्ह बनवले होते.
यासह एका सोनेरी रंगाच्या फितीत हे बजेट होते. विशेष म्हणजे हे कापड निर्मला यांना त्यांच्या मामीनं गिफ्ट केले होते. तर, मागील वर्षी म्हणजेच, 2021ला निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे सादर केला होता. Budget2021 ची सॉफ्ट कॉपी, ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं होत.
– अशा प्रकारे बदलत गेला अर्थसंकल्प सादर करण्याच्या फॉर्मेट
2014: ब्लैक ब्रीफकेस
2015: ऑरेंज ब्रीफकेस
2016: रेड ब्रीफकेस
2017: ब्राउन ब्रीफकेस
2018: मरून ब्रीफकेस
2019: रेड ब्रीफकेस/ वहीखाता
2020: वहीखाता
2021: देशी टैब (मेड-इन-इंडिया टॅबलेट)