नववधू आली चक्क शवपेटीतून

नवी दिल्ली : कोणी मोटारीतून… कोणी बुलेटवरून… तर अगदी कोणी हेलिकॉप्टरमधून विवाहासाठी येतात… पण विवाहाच्या रिसेप्शनसाठी एक वधू आली ती चक्क शवपेटीतून… या तिच्या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे…

या महिलेला शवपेटीतून बाहेर येताच तिचे नातेवाईक आणि उपस्थित अचंबितच झाले. होय ती खरंच शवपेटीतून आली. या रिसेप्शनच्या ठिकाणी एक पांढरी शवपेटी काळ्या कापडात झाकून आणण्यात आली. विवाहस्थळी शवपेटी कशी काय? म्हणून लोक गोळा झाले… त्यांच्यात कुजबूज सुरू झाली… कोणाला काहीच कळेना… तेवढ्यात शवपेटी उघडली…. त्यातून चमचमत्या सोनेरी रंगाचा पोशाख परिधान केलेली नववधू बाहेर आली…अगदी हसत.. आणि नाचत… तिला पाहताच लोक उत्साहित झाले… तिची छायाचित्रड काढू लागले…

हे सारे तिनं का केले याचा उलगडा काही हा व्हिहडिओ पाहून होत नाही. या व्हिडिओची तारीख आणि वेळही समजू शकलीनाही.मात्र हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. मात्र काही जणांनी हा व्हिडिओ पाहूनब शॉक बसल्याचे नमूद केले आहे. तर काही कणांनी ती विकृत आणि आजारी मनोवृत्तीची असल्याचे म्हटले आहे. काही जणांनी हा स्टंट करण्याची गरजच काय होती असा सवाल उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.