नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे. याबाबतची माहिती काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. राहुल गांधींचे ट्विटर खाते पुन्हा सुरु करण्यासाठीची प्रक्रिया सुरु असल्याचंही काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी दिल्ली येथील दलित अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार व हत्या प्रकरणामध्ये मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी याबाबतचा फोटो आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला होता. राहुल गांधींच्या या पोस्टवर, बलात्कार व हत्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची ओळख गुप्त ठेवण्यात येते. याचे राहुल गांधी उल्लंघन केले असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.
यानंतर राहुल गांधी यांच्या ट्विटर खात्यावर कारवाई करण्यात यावी अशी सूचना, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने केली होती. याची दाखल घेत आज राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते स्थगित करण्यात आले. याशिवाय ट्विटरने यासंदर्भात राहुल गांधी यांच्याकडून त्यांनी केलेल्या पोस्टबद्दल स्पष्टीकरणदेखील मागितले आहे.
ट्विटरने पोस्टदेखील केली ब्लॉक
पीडित मुलीच्या कुटुंबियांना राहुल गांधी भेटत असल्याचा फोटो ट्विट करण्यात आला होता. मात्र यावर ट्विटरने कारवाई करत राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट तात्पुरते सस्पेंड केले आहे. तो फोटोही आता ट्विटरवर उपलब्ध नाही. राहुल गांधी यांच्या त्या ट्विटवर क्लिक केल्यास ‘या ट्विटने ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केले आहे’, असा मेसेज येतो आहे.
Congress leader Rahul Gandhi’s Twitter account has been temporarily suspended & due process is being followed for its restoration, tweets Congress Party pic.twitter.com/HpT9oNlRQY
— ANI (@ANI) August 7, 2021