Odisha Train Accident – ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या अपघातानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या बचाव कार्याची माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर पीएम मोदी ओडिशातील अपघातस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी अपघातस्थळी पाहणी केली आणि घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
#WATCH प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्थिति का जायजा लेने के लिए बालासोर ट्रेन दुर्घटना स्थल पर पहुंचे। #OdishaTrainAccident pic.twitter.com/ombyLlmb58
— ANI_HindiNews (@AHindinews) June 3, 2023
ओडिशातील बहानगा गावाजवळ हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. त्यानंतर अचानक या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी मालगाडी धडकली. यातच 280 जणांचा मृत्यू झाला आणि 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
आज संध्याकाळपर्यंत बचावकार्य पूर्ण होईल
एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, ‘एनडीआरएफच्या 9 टीम अपघातस्थळी बचाव करत आहे. घटनेनंतर पाऊण तासात आमची पहिली टीम तिथे पोहोचली होती. 300 हून अधिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत आणि आम्ही आज संध्याकाळपर्यंत तेथे ऑपरेशन पूर्ण करू शकतो.’