न्यूयॉर्क : जगातील शक्तीशाली देश अमेरिका सध्या हिमवादळाच्या तडाख्याने हैराण झाले आहे. अमेरिकेतल्या कोट्यवधी नागरिकांचे या बर्फवृष्टीने हाल होत आहेत. नागरिकांना बर्फवृष्टीमुळे घराबाहेर पडता येत नाही, वीज नाही, आरोग्य सुविधा नाहीत आणि तापमान शून्य अशांच्याही खाली गेल्याने संपूर्ण महाशक्ती गारठून गेली आहे.
स्थानिक माध्यमांनुसार, 14 लाखांपेक्षा अधिक घरातील वीज गायब झाली आहे. तर तापमान -45 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. अमेरिकतल्या बर्फवृष्टीची दृष्यं थरकाप उडवणारी आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधली अनेक शहरं बर्फाच्या खाली गेली आहेत. बर्फाच्या वादळाने लोकांना हाऊस अरेस्ट केले आहे. घरांच्या भिंतींवर चार फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणं कठीण होऊन बसलेआहे. एवढेच नाही तर महाकाय समुद्रदेखील बर्फाने गोठून गेला आहे.
The scene at Hoaks restaurant in Hamburg is surreal. It looks like an Ice Castle! @news4buffalo pic.twitter.com/aNRC8Z1UnR
— Chris (@CBNEWSPHOTOG) December 24, 2022
बर्फाच्या वादळाने जवळपास 14 लाख लोकांच्या घरातली वीजपुरवठा खंडित झाला आहे. अमेरिकतल्या विविध व्यवसायांना या हिमवादळाने ब्रेक लावला आहे. सध्या अमेरिकेतल्या 13 राज्यांत ब्लॅकआऊटचा धोका आहे. ब्लॅकआऊट झाला तर जवळपास साडे तेरा कोटी लोकांना त्रास सहन करावा लागेल आहे. अमेरिकेत बर्फाच्या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
A driving band remains in effect in the Town of Hamburg. Many side streets are still impassable. pic.twitter.com/tvYBcGaPN5
— Chris (@CBNEWSPHOTOG) December 26, 2022
अमेरिकेच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जवळपास 20 कोटी जनतेला याचा फटका बसू शकतो. या हिमवादळाने ख्रिसमसच्या आनंदावर विरजण पडले आहे. आत्तापर्यंत जवळपास 7 हजार 700 विमान उड्डाणं रद्द झाली आहेत. हजारो लोक सध्या एअरपोर्टवर अडकून आहेत. अमेरिकेच्या इतिहासातले हे सर्वात भयंकर हिमवादळ मानले जात आहे. आत्तापर्यंत 48 जणांचा बळी घेणाऱ्या या वादळासमोर सुपरपॉवर अमेरिका हतबल पाहायला मिळत आहे.