मुंबई – बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या त्यांच्या आगामी ‘बावल’ सिनेमामुळे चांगेलच चर्चेत आले आहेत. येत्या 21 जुलै रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून, हे दोघेही कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.
दरम्यान, वरुण आणि जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून या फोटोमुळे ‘बावल’ अभिनेत्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. फोटोमध्ये वरुण जान्हवीसोबत असे काही करताना दिसत आहे जे लोकांना अजिबात आवडत नाही.
प्रमोशन दरम्यान, जान्हवी आणि वरुणचे दोन फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघे काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. एका फोटोमध्ये वरुण जान्हवीचा कान चावत असल्याचे दिसत आहे. यावरून सध्या नेटकऱ्यांनी अभिनेत्याला चांगलंच धारेवर धरलं आहे.
फोटो पाहून हे समजते की दोघेही मस्तीच्या मूडमध्ये आहेत आणि वरुणने मजेमध्ये जान्हवीच्या कानाला चावा घेतला आहे, पण अभिनेत्याचे हे हावभाव लोकांना अजिबात आवडले नाहीत. दरम्यान, शेअर केलेल्या या फोटोंमध्ये हे दोन्ही कलाकार अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहेत.