मुंबई – प्रत्येक व्यक्तीसाठी, त्याचा पहिला पगार खूप खास असतो, कारण त्याने पहिल्यांदा मेहनत करून स्वतःचे पैसे कमवले असते. बी-टाउन स्टार्ससाठीही, त्यांचा पहिला पगार त्याच्या हृदयाच्या जवळ असतो. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचा पहिला पगार कुठे खर्च केला.
शाहरुख खान बॉलीवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. पण तुम्हाला माहित आहे का, त्यांचा पहिला पगार होता फक्त 50 रुपये. होय, पंकज उधासच्या एका कॉन्सर्टमध्ये काम करताना शाहरुखला 50 रुपये पगार मिळाला, जो त्याने ट्रेनने आग्राला जाण्यासाठी खर्च केला.
हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून पदार्पण केले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल की त्याने बालकलाकार म्हणूनही काम केले आहे. ‘आशा’ चित्रपटासाठी बालकलाकार म्हणून त्याला 100 रुपये मानधन मिळाले, त्यातून त्यांनी एक खेळणी कार खरेदी केली.
बॉलीवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सलमान खानने ‘बीवी हो तो ऐसी’ चित्रपटात काम केले होते, परंतू येथे त्याची पहिली कमाई झाली नाही. एका मुलाखतीत, अभिनेत्याने खुलासा केला होता की, ताज हॉटेलमध्ये बॅक डान्स करताना त्याला 75 रुपये मिळाले, जे त्याने केवळ फिरण्यासाठी खर्च केले.
ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा जगभरात आपलं नाव कमवत आहे. आज ती करोडोंची कमाई करत असली तरी तिचा पहिला पगार होता फक्त ५ हजार रुपये, जो तिने आईच्या हातात दिला होता.
वरुण धवन हा बी-टाउनचा एक उगवता स्टार आहे, ज्याने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यापूर्वी त्याने एमएडी नावाच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये इंटर्नशिप केली होती, त्यासाठी त्याला 2 हजार रुपये मिळाले आणि हे पैसे त्याने आईला दिले.