Bollywood News । साऊथपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत सगळेच बिग बजेट चित्रपट बनवण्यात व्यस्त आहेत. पण कमी बजेटचे चित्रपट करूनही धमाल करणाऱ्या स्टार्सच्या यादीत आयुष्मान खुरानाचे नाव येते. त्याच्या चित्रपटांनी 100-100 कोटींची कमाई केली आहे. आयुष्मान खुराना त्याच्या चित्रपटांच्या कथांवर अधिक लक्ष केंद्रित करतो.
आयुष्मानकडे येत्या काळात मोठे प्रोजेक्ट असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये सनी देओलचा बॉर्डर 2 सोबतच तो या सहा चित्रपटांमध्ये काम करणार आहे.
गदर 2 च्या जबरदस्त यशानंतर सनी देओल पुन्हा एकदा मागणीत आहे. अशात त्याच्या बॉर्डरच्या सिक्वेलची चर्चाही जोरात सुरू आहे. सनी पाजीसोबत आयुष्मान खुराना देखील या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असेल असे मानले जात आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे शूटिंगही याच वर्षी सुरू होणार आहे.
आयुष्मान खुराना ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रात तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव देखील मुख्य भूमिकेत आहेत.
आयुष्मान खुरानाला राज शांडिल्याच्या पुढील चित्रपटाची ऑफर आहे. ज्यामध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच दिनेश विजानचा हॉरर कॉमेडी चित्रपटातही तो दिसणार आहे. आयुष्मान खुराना आणि दिनेश विजान यांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
ड्रीम गर्लचे यापूर्वीचे दोन भाग सुपरहिट ठरले आहेत. अशात ड्रीम गर्ल 2 च्या जबरदस्त यशानंतर आता निर्माते आयुष्मान खुरानासोबत चित्रपटाचा तिसरा भाग बनवणार असल्याचे मानले जात आहे.