बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी लवकरच चिनपेक्षा प्रगत ब्ल्यू प्रिंट : सीतारामन

नवी दिल्ली : परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी प्राधान्याचे राष्ट्र वाटावे म्हणून आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांनासाठी चीनपेक्षा प्रगत अशी ब्ल्यू प्रिंट बनवत आहोत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

जे उद्योगपती चीनमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करतात ते भारतीय बाजारपेठेचाही विचार नक्की करतील. त्यामुळे उद्योग जगतातील धुरीणांना भेटून त्यांना भारतात निमंत्रित करणे, सरकारसाठी महत्वाचे आहे. मी ते निश्‍चीतच करेन. त्यामुळे चीनमधून बाहेर पडलेल्या िंकंवा तसा विचार वकरणाऱ्या अमेरिकन, युरोपीयन अथवा अन्य कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उद्योजकांना भेटण्यासाठी मी योजना आखत आहे.

मी एक ब्लू प्रिंट बनवेन त्याच्या मदतीने मी त्यांना भेटेन. या ब्ल्यू प्रिंटद्वारे मी त्यांना भारत हे प्राधान्याचे राष्ट्र का? हे समजावून सांगेन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेच्या वार्षिक बैठकीतील त्यांच्या भाषणानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. इलेक्‍ट्रॉनिक, लिथियम बॅटरी िंकंवा सेमी कंडक्‍टरसारख्या क्षेत्रात भारतातही तेवढाच वाव आहे.,असे त्या म्हणाल्या.

चीन आणि अमेरिका यांच्यात काय घडत आहे यावर कंपन्यांचे स्थलांतर अवलंबून नसतो. मात्र त्याचा काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो. पण कंपन्या विस्थापित होत असताना त्याला अन्य कारणेही असतात. म्हणून मी थोडक्‍यात सांगितले, चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यासाठी स्वागत आहे. तेथे राहणाऱ्या कंपन्या चीनी बाजारपेठेची सेवा करू शकतात, असे त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.