अमृतसर – पंजाबातील सत्तारूढ आम आदमी पक्षाला संगरूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूक गमवावी लागली आहे. ही जागा पुर्वी आम आदमी पक्षाच्या भगवंत मान यांच्याकडेच होती. पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.
या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार गुरमेल सिंग यांना अकालीदलाचे उमेदवार सिमरनजीतसिंग मान यांनी पराभूत केले. मान यांना 30 हजार 503 मते मिळाली तर गुरमेल सिंग यांना 22 हजार 402 मते मिळाली. हा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या प्रभावाखालील मतदार संघ आहे. पण तेथेच आम आदमी पक्षाला पराभव पत्करावा लागणे याला मोठे राजकीय महत्व आहे.
राज्यात अलिकडेच सत्ताबदल होऊन आम आदमी पक्षाला मोठ्या बहुमतासह राज्यात सत्ता मिळाली आहे. असे असताना पक्षाला पराभव पत्करावा लागणे हा एक धोक्याचा इशारा समजला जातो आहे.