‘रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान’, आमदार अशोक पवार

वाघोली-  रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान असल्याचे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले. वाघोली तालुका हवेली येथे जागतिक रक्तदाता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या वतीने केसनंद फाटा वाघोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना शिरूर-हवेली चे आमदार अशोक  पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अशोक बापू पवार यांनी सांगितले की covid-19 च्या वाढता प्रादुर्भाव च्या काळात वाघोली आणि परिसरासाठी धर्मेंद्र सातव यांनी दोन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

covid-19 च्या काळात वाढत्या रुग्ण संख्येला रोखण्यासाठी या रक्तदानाची खूप मोलाची मदत झाली रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्तदान मोलाचे काम करून गेले आहे. यावेळी ससून रक्तपेढी चे विभाग कार्यवाह किरण ठाकरे यांच्या सहकार्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ज्ञानदेव म्हेत्रे, शंकर सातव, बाळासाहेब काळभोर, सुप्रिया लोखंडे, अनिता कांबळे, बापू कोकरे, दादा काळोखे, हरी सूर्यवंशी, नंदू कोळेकर, अब्दुल पठाण, दत्ता बहिरट, कैलास कुसाळकर, मुक्तेश्वर खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.