दौंड-लिंगाळी (ता. दौंड) येथील वीर बाजी पासलकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 85 बॅग रक्त संकलित झाले असल्याची माहिती उपसरपंच गणेश जगदाळे यांनी दिली.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवणार असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वीर बाजी पासलकर मित्र मंडळाच्या माध्यमातून लिंगाळीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असुन 85 बॅग रक्त संकलित झाले आहे. देशावर जे संकट ओढवले आहे, या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही हे रक्तदान घेवून शासनास सहकार्य करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, असे उपसरपंच जगदाळे म्हणाले.