पुणे – नऱ्हे येथे आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, रामदास कदम यांना भर कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चातर्फे काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी उमेश शिंदे आणि तानाजी चिकणे यांनी मराठा समाज आरक्षणप्रश्नी आक्रमक भूमिका मांडली.
या गोंधळामुळे सिंहगड रोड पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. त्यावेळी चंदन कड, उमेश शिंदे, रमेश दौंडकर, बाळासाहेब चव्हाण, सुभाष ढमाले, अभिजीत कदम, आकाश देशमुख, सुमित कदम, राजेंद्र लिपाणे, विलास बरसले, तानाजी चिकणे यांना नऱ्हे पोलीस चौकीत नेण्यात आले. दोन तासांनी त्यांना सोडण्यात आले.
“कार्यक्रमात काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही अगोदरच बंदोबस्त ठेवला होता. काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंधरा जणांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.” – अभय महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक