कोलकाता: आपल्या पक्षाचे आमदार देवेंद्रनाथ रॉय यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने आज बारा तासांचा उत्तर बंगाल बंद पुकारला होता. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या काळात भाजप समर्थक अिाण पेलिसांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी झडल्या.
भाजप कार्यकर्त्यांनी बसेसवरही तुफान दगडफेक केली. कुचबिहार शहरात सक्तीने बंद करण्यास भाग पाडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांशी मोठीच धुमश्चक्री झाली. तेथे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन बसेस बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना तेथून हलवले.
सिलीगुडीत बंदच्या काळात बहुतांशी व्यवहार सुरू राहिले. खासगी बसेस मात्र तेथे फार तुरळक प्रमाणात रस्त्यावर दिसत होत्या. सिलीगुडीच्या काही भागात कंटेन्मेंट झोन या आधीच जाहीर झाल्याने तेथील दुकाने व संस्था बंद होत्या. मालडा आणि उत्तर दिनाजपूर येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजप समर्थकांनी येथे मोर्चा काढून रॉय यांच्या चौकशीची मागणी केली.