पनवेलमध्ये लॉकडाउन वाढवला

मुंबई: कोविड-19 च्या विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकादा लॉकडाऊन वाढवला आहे. आता 24 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी लॉकडाऊन आदेशात नमूद आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन पालिकेच्यावतीन करण्यात आले आहे.

पनवेल पालिकेने याआधी 3 जुलै ते 14 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला होता. आज हा लॉकडाऊन संपणार होता. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव सुरुच असल्याने आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांचा आकडा चार हजारांच्या घरात पोहोचला आहे. लॉकडाऊन असताना नागरिक घराबाहेर पडत असल्याने लॉकडाऊन कडक करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तोंडाला मास्क वापरणे बंधककारक असणार आहे.

यामध्ये करोनावर मात करण्यासाठी म्हणून अनेक परिसरांमध्ये कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काही भागांमध्ये कडक लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात यावी अशी मागणीही स्थानिकांनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.