मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यात आता काँग्रेसने उडी घेतली असून मराठा आरक्षण विरोधातील न्यायालयीन लढाईत भाजपचे पदाधिकारी असल्याचे पुरावे काँग्रेसकडून देण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणाला भाजपकडूनच विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. या मुद्द्यावरून सावंत यांनी काही कागदपत्रे ट्विट केली आहेत. #SaveMeritSaveNation भाजप व संघाशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सावंत यांनी यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही सवाल केला आहे.
मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? @BJP4Maharashtra ने उत्तर द्यावे. @ChDadaPatil जी ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का? pic.twitter.com/qNrljdm5vo
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 28, 2021
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःच्या पत्त्यावर ही संस्था स्थापन केली ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे ? असा सवा सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांना केला. तसेच भाजपची ही मराठा समाजाशी गद्दारी नाही का ? असा खोचक प्रश्न त्यांनी केला.
डॉ अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते तेव्हा भाजपा गप्प का होती? न्यायालयात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत होते तेव्हा भाजपा गप्प का होती? हे मूक समर्थन होते का? मागून पाठिंबा दिला का? @BJP4Maharashtra उत्तर द्या pic.twitter.com/YkPsHlgidS
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 28, 2021
डॉ. अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते, तेव्हा भाजप गप्प का होती ? न्यायालयात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत होते, तेव्हा भाजप गप्प का होती? हे मूक समर्थन होते का? महाराष्ट्र भाजपने उत्तर द्यावे, असं आव्हान सावंत यांनी दिलं.