“बिग बॉस’वर बंदी घालण्याची भाजप आमदाराची मागणी

गाझियाबाद- सध्या टिव्हीवर गाजत असलेल्या “बिग बॉस’च्या 13 व्या सीझनवर बंदी घालण्यात यावी, अशी मागनी उत्तर प्रदेशातील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केली आहे. “बिग बॉस-13’मधून अश्‍लीलतेला प्रोत्साहन दिले जात आहे.

त्यामुळे या रिऍलिटी शोवर बंदी घालावी आणि “बिग बॉस’चा सूत्रधार अभिनेता सलमान खानवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कठोर तरतूदींखाली खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र गुर्जर यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहीले आहे.

“बिग बॉस-13′ हा “प्राईम टाईम’ला प्रसारित होतो. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात एकत्रित बसून टिव्ही बघत असतात. “बिग बॉस’ने सामाजिक सौहार्द नष्ट केले असून अश्‍लीलतेला प्रोत्साहन दिले जात आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्राचीन संस्कृती आणि परंपरांचा प्रचार करीत आहेत आणि दुसरीकडे हा अश्‍लील कार्यक्रम राजरोसपणे दाखवला जात आहे.

या कार्यक्रमामुळे कुटुंबासह एकत्रितपणे टिव्ही बघणे अशक्‍य झाले आहे. आपल्या संस्कृतीला बाधा पोहोचवणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये, असेही गुर्जर यांनी म्हणाले आहे.

“बिग बॉस’चा निषेध करण्यासाठी गाझियाबाद शहरातील लोणी भागात सोमवारी आणि बुधवारी काही हिंदू संघटनांनी सलमान खानच्या प्रतिमांचे दहन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)