हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चहापान आयोजन करण्यात आले होते. राज्यात नवीन आलेले ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष राज्यातील प्रश्नावर संयुक्त चर्चा करतील, अशी आशा होती. आज जागतिक चहापान दिन असुनसुद्धा भाजपने चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला, असे ट्विट त्यांनी केले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापान कार्यक्रमात आज नवीन आलेले सरकार आणि विरोधी पक्ष राज्यातील ज्वलंत समस्यांवर संयुक्त चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. विशेष म्हणजे आज #InternationalTeaDay सुद्धा आहे. पण दुर्दैवाने भाजपने या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
— Ashok Chavan (@AshokChavan1958) December 15, 2019
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचे आयोजन करण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधीपक्ष कायम बहिष्कार टाकत असल्याची परंपरा सुरू आहे.