मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने आज आपला 34वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. श्रद्धाने आपल्या कुटुंबीयांसह बर्थडे सेलिब्रेशन केले. सध्या ती आपला चुलतभाऊ प्रियांक शर्मा याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी मालदीवला गेलेली आहे.
शक्ती कपूर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, ते लग्न आणि श्रद्धा कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्रित मालदीवला आले असल्याने खूप मजा येईल.
त्याचवेळी श्रद्धा कपूरने तिच्या वाढदिवशी वडील शक्ती कपूर यांच्याकडे खास भेट मागितली आहे.
आपण आपल्या लाडक्या मुलीला काय गिफ्ट देणार, असे शक्ती कपूर यांना विचारले असता ते म्हणाले,
श्रद्धाची इच्छा आहे की मी धूम्रपान करणे सोडून द्यावे आणि ही तिच्यासाठी मोठी भेट असेल. शक्ती कपूर म्हणाले की, मी आपल्या मुलांना जीवनात स्थिर असल्याचे बघू इच्छित आहे. परंतु या दिवसात मुले स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.
दरम्यान, “तीन पत्ती’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रद्धा कपूरने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. “आशिकी 2’मधील तिच्या कामाचेही खूप कौतुक झाले होते. ती लवकरच पुन्हा कमबॅक करणार आहे.