नवी दिल्ली – आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन व्यावसायिकांवर घातलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची अवैध संपत्ती जप्त केली आहे. यातील एक व्यावसायिक डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील असून दुसरा व्यावसायिक घन कचरा व्यवस्थापनातील आहे.
या दोघांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर छापे घालून ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकाच्या बंगळुरू, सूरत, चंदीगड, आणि मोहाली येथील ठिकाणांवर छापे घालण्यात आले त्यांनी हवाला मार्गे मोठी संपत्ती देशाबाहेर हलवल्याचेही निष्पन्न झाले आहे.
प्राथमिक तपासात त्यांनी 70 कोटी रुपयांची अवैध संपत्ती जमा केल्याचे उघडकीला आले आहे. दुसऱ्या व्यावसायिकाकडे जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील मात्र अजून जाहीर झालेला नाही.