पुणे – पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यत्रातील एकूण 28 पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला कोटयावधी रुपयांचा अंमली पदार्थ मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या भट्टीत नष्ट करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस 28 ठाण्यातील एकूण 156 गुन्हयातील चरस, गांजा, कोकेन, मेफेड्रोन, ब्राऊन शुगर असा मुद्देमालाचा नाश करण्यात आला आहे.
या कारवाईत एक कोटी 31 लाख रुपयांचा 655 किलो गांजा, दोन लाख 78 हजार रुपये किमंतीचे 400 ग्रॅम चरस, एक कोटी नऊ लाख 86 हजार रुपयांचे एक किलो 821 ग्रॅम कोकेन, सहा लाख 40 हजार रुपयांचे मेफेड्रोन, एक कोटी 74 लाख आठ हजार रुपयांचे चार किलो 352 ग्रॅम ब्राऊन शुगर, सात लाख 70 हजार रुपयांचे एमफेटामाईन, 14 लाख 44 हजार रुपये किंमतीचे 361 ग्रॅम मॅथेक्युलोन असा सर्व मिळून एकूण साडेचार कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सह आयुक्त रविंद्र शिसवे यांचे मार्गदर्शनाखशली गठित करण्यात आलेल्या अपर पोलीस आयुक्त आशोक मोराळे यांचे कमिटीच्या देखरेखीखाली नाश करण्यात आला आहे.
ही कार्यवाही सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, प्रकाश खांडेकर, गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, उपनिरीक्षक अमोल गवळी, पोलीस अंमलदार प्रविण शिर्के, प्रमोद ढिरंगे, अनिल भोग, हर्षल धुसाणे, गणेश देशपांडे, राहुल जोशी, संदीप जाधव, पांडुरंग पवार आदींच्या पथकाने केली.