अकोला – राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा आज निकाल जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात बच्चू कडूंच्या प्रहारचा मोठा विजय झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील कुटासा येथे प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांना विजय झाला असून आमदार अमोल मिटकरींना आपल्याच गावात पराभव पत्कारावा लागला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा १४ पैकी १० जागांचा निकाल लागला असून त्यामध्ये अकोला जिल्हा परिषद 11 पैकी सहा जागांवर वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागांवर अपक्ष गटाला आणि राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार, भाजपाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. कुटासा गावाच्या पोटनिवडणुकीत हात मिळवणी केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला होता. यासंदर्भात मिटकरी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली होती.