नवी दिल्ली : भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये भूकंपाचे तीव्र झटके बसल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतल्या एनसीआर ते जम्मूपर्यंतची जमीन हादरली आहे. दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी हे तीव्र धक्के जाणवले असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे केंद्र जम्मू काश्मीरचे डोडा आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या झटक्यांची तीव्रता ५.४ इतकी नोंदवली गेली असल्याचे म्हटले जात आहे.
श्रीनगरमधील स्थानिकांनी भूकंपाविषयी सांगितले की, “आज जे झटके बसले ते तीव्र होते. जी मुलं शाळेत गेली होती ती घाबरली होती. गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे झटके बसले आहेत.” EMSC च्या माहितीनुसार किश्तवाडच्या ३० किमी अंतरावर असलेल्या दक्षिण पूर्व भागात हा भूकंप आला.
Earthquake of Magnitude:5.4, Occurred on 13-06-2023, 13:33:42 IST, Lat: 33.15 & Long: 75.82, Depth: 6 Km ,Location: Doda, Jammu and Kashmir, India for more information Download the BhooKamp App https://t.co/OyJTMLYeSm@ndmaindia @Dr_Mishra1966 @Indiametdept @KirenRijiju pic.twitter.com/6Ezq3dbyNE
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) June 13, 2023
दरम्यान, या अगोदर मार्च महिन्यातही देशातील काही राज्यांना भूकंपाचे झटके बसले होते. त्यावेळच्या भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ६.६ इतकी नोंदवली गेली.
दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हे झटके बसले होते. त्या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानातलं हिंदूकुश क्षेत्र होतं.