जालना – नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या नातेवाईकांना 10 लाखांचे अर्थसहाय्य केले होते. मदत करण्यात आलेल्यांची यादीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवर शेअर केली होती. सतत पाठपुरावा केल्याने मराठा समाजातील 34 युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले होते. त्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचेही राजेशे टोपे यांनी सांगितले आहे.
सतत पाठपुरावा केल्याने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला.बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने आज 10 लक्ष रुपये मदत वितरित केली आहे. pic.twitter.com/shelDMkDHs
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 29, 2021
यांना मिळाली मदत –
शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे.