सुप्रिया सुळेंनी शेअर केला शरद पवारांच्या पावसातील सभेचा फोटो; म्हणाल्या…

Madhuvan

मुंबई –  महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसाच्या सभेला रविवारी एक  वर्ष पूर्ण होत आहे .

शरद पवारांच्या पावसातील सभेची आज वर्षपूर्ती

महाराष्ट्रातील या सत्ताबदलाची व पवारांच्या साताऱ्याच्या पावसातील सभेची देशभर चर्चा झाली . याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे  की,’प्रतिकूल परिस्थितीतही मैदानात ठामपणे उभे राहून यशस्वी झुंज देण्यासाठी जी शक्ती लागते तिचं नाव आदरणीय शरद पवार  साहेब…!’

दरम्यान,या  घटनेचे स्मरण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ग्वाल्हेर बेंगलोर आशियाई महामार्गावर आनेवाडी टोलनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या दरम्यान पवारांच्या सभेचे फलक लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.