Devgad beach – देवगड समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका खासगी सैनिक अकॅडमीतीचे पाच विद्यार्थी बुडाले आहेत. यामधील चौघांचे मृतदेह मिळाले असून एक जण बेपत्ता आहे.या मृत्यूांमध्ये चार मुलींचा समावेश आहे, तर एक मुलगा बेपत्ता आहे.
प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ आणि पायल बनसोडे अशी मृतांची नावे आहेत. तर राम डिचोलकर हा बेपत्ता आहे. ही दुर्घटना दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल देवगड येथे आली होती.
समुद्र किनाऱ्यावर पोहचल्यानंतर आंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामूळे या गृपमधील काही जण समुद्रात आंघोळीसाठी उरतले. यातील पाच जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यात चार मुली आणि एक मुलगा होता.
चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळण्यास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी, तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटनास्थळी धाव घेतली.