निजामाबाद – जर ध्येय उच्च असेल आणि दृढ आत्मविश्वास असेल तर प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्ने पूर्ण करतो. जगातील सर्व संकटांना मागे टाकून तो यशाच्या मार्गावर पुढे जात असतो. निजामाबाद जिल्ह्यातील नंदवाडा येथील रहिवासी असलेल्या हरिकाने यूट्यूब व्हिडिओंच्या मदतीने एमबीबीएसचा अभ्यास करुन मेडिकलची परीक्षा उत्तीर्ण केल्याने, हे खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. हरिकाची आई विडी कारखान्यात काम करते. हरिकाने आपल्या मेहनतीच्या आणि झोकून देऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिलेच नाही तर ते पूर्णही केले आहे.
हरिकाने यंदाच्या NEET परीक्षेत 40,000 ची अखिल भारतीय रॅंक मिळवली, तर राज्य स्तरावर तिचा क्रमांक 700 होता. त्यांना जागा मिळाली असली तरी त्यांचा त्रास अद्याप संपलेला नाही. एमबीबीएसच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हरिकाने जनतेला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
टीआरएसच्या आमदार आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता कलवकुंतला यांनी हरिका आणि तिच्या आईची भेट घेतली आणि हरिकाच्या यशाबद्दल तिचे कौतुक केले. कलकुंतला यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘स्वप्न पाहण्याची हिम्मत करा आणि ती पूर्ण होईपर्यंत काम करणे थांबवू नका. यूट्यूब व्हिडीओजच्या माध्यमातून एमबीबीएस परीक्षेत यश मिळवणाऱ्या हरिकाची ही कहाणी आहे. मी हरिका आणि तिच्या आईला अनुराधाला भेटले आणि हरिकाच्या फीचा पहिला हप्ता देऊन त्याच्या स्वप्नाला पाठिंबा दिला.
निजामाबादमधील एका बिडी कारखान्यात काम करणाऱ्या एका महिलेची मुलगी, हरिका ही प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे, जी त्यांची स्वप्ने जगण्याची निवड करतात. हरिका आणि तिच्या आईला भेटणे आणि त्यांच्या अतुलनीय प्रवासाचा एक भाग असणे हा खरोखरच एक आशीर्वाद आहे. एमएलसी कविता यांनी हरिकाला भेटतानाचे फोटोही शेअर केले आहेत.
हरिका लहान असताना तिचे वडील शिवकुमार यांचे निधन झाले होते. तिची आई अनुराधा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी विडी कारखान्यात काम करते. इंटरमिजिएटमध्ये चांगले मार्क्स मिळवल्यानंतर हरिकाने डॉक्टर होण्याचे ध्येय ठेवले.