वाघोली –
येथील वॉर्ड क्रमांक सहामधील येंकाई सोसायटी व साईराज फेज-2 येथील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव पाटील, माजी उपसरपंच मारुती गाडे, माजी उपसरपंच संदीप सातव, माजी उपसरपंच जयश्री काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघोलीच्या उपसरपंच मालती गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
वाघोली (ता. हवेली) येथील वॉर्ड क्रमांक सहा मधील येंकाई सोसायटी व साईराज फेज-2 रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायतीकडून 29 लाख 13 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या रस्त्याचा मूलभूत प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. वॉर्ड क्रमांक सहामधील नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी सदैव तयार असल्याचे उपसरपंच मालती गोगावले यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी गणेश गोगावले, सुनील काळे, नवनाथ गोगावले, रमेश आव्हाळे, प्रशांत देवळे, अनिल रोहोकले, हरिभाऊ नरसाळे, शिवाजी बहिरट, प्रदीप कांबळे उपस्थित होते.