मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या लूकने आणि अनोख्या पोशाख निवडींनी ती नेहमीच चाहत्यांचे मन जिंकत असते. भूमीने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच भूमीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली आणि तिच्या लूकने सर्वांना थक्क केले.
भूमी पेडणेकरने 12 फेब्रुवारी 2023 रोजी सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनला हजेरी लावली आणि तिच्या पोशाखाने सर्वांची मने जिंकली. इव्हेंटसाठी, भूमी एका बोल्ड ग्लिटरी ब्लाउजमध्ये आणि भारी सुशोभित केलेल्या लेहेंगामध्ये दिसली होती, जी तिने हेवी दुपट्ट्यासह स्टाईल केली होती. दरम्यान, सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरचा लूक पाहून सासरचं मंत्रमुग्ध झाले तिच्या सेक्सी लूकशिवाय, भूमीने इव्हेंटमधील तिच्या व्हायरल व्हिडिओमुले चर्चेत होती. हा व्हिडिओ एका पापाराझी इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आला होता, जो नंतर हटवण्यात आला.
व्हिडिओमध्ये, भूमी पार्टीमधून बाहेर पडताना दिसत होती आणि तिच्यासोबत एक मिस्ट्री मॅन होता. निळ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी पँट घातलेल्या त्या माणसाने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला आणि तिचे चुंबन घेतले. यावेळी काही बॉडीगार्डने कॅमेरे झाकण्याचा प्रयत्न केला तरी पापाराझींनी त्या दोघांचा विडिओ शूट केला. व्हायरल व्हिडीओमधील त्या माणसाबद्दल त्यांनी अंदाज लावल्याने नेटिझन्स गोंधळून गेले.