देहू – येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालयामध्ये दिनांक १३ फेब्रुवारी रोजी माऊली प्रतिष्ठान पुणे आयोजित चित्रकला, निबंध व वत्कृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेच्या प्राचार्या शोभा पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद यादव, उपमुख्याध्यापिका विद्या कांबळे, पर्यवेक्षिका स्वालेहा पठाण, गुरुकुल समन्वयक डुबल, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आनंदराव तांबे, संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा वडाळकर, देणगीदार नारायण मोरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला गुणांना वाव दिला पाहिजे आपल्यातील कला कृती आत्मसात केली पाहिजे. परिस्थिती नुसार माणसाने बदलले पाहिजे. जीवनात भाषा आणि गणित किती महत्वाचे आहे याचे धडे यावेळी शोभा पवार यांनी विद्यार्थ्यांना दिले. त्याचबरोबर शिक्षकांना अध्यापन करत असताना येणाऱ्या अडचणी देखील जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद यादव यांनी केले. सूत्रसंचालन प्रियदर्शनी पाटील यांनी. तर कार्यक्रमाचे आभार विद्या कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे वृत्त संकलन सुरेश शिंदे यांनी केले.