भुलेश्वर- भुलेश्वर महादेवाची श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्त प्रातिनिधिक यात्रा शांततेत पार पडली. यावेळी नीलकंठेश्वर रुपात भुलेश्वर महादेव सजवले होते.
पहाटे तीन वाजता येथील येथील पुजारी मंडळाच्या वतीने शिवलिंगाला रुद्राभिषेक करून सकाळी सहा वाजता महाआरती करण्यात आली नेहमीप्रमाणे प्रातिनिधीक यात्रा पार पडली. पुराणातील आख्यायिकेप्रमाणे श्री भुलेश्वर महादेव या डोंगरावर तपसाधना करत होते आज भुलेश्वर महादेवाचे तेच रूप पाहायला मिळाले त्यावेळी पुजारी मंडळाने सजावटीसाठी खास विविध प्रकारची झाडांची रोपे मागून घेतली होती. गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या भोवती विविध प्रकारची झाडांची आरास करण्यात आली होती. यावेळी साक्षात महादेव या भुलेश्वराच्या डोंगरावर जंगलांमध्ये साधना करीत असल्याचा भास होत होता. देवस्थानच्या पुजाऱ्यांनी सांगितले की, या पूजेनंतर ही झाडे या डोंगरावरच लावली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते.