‘क्वालकॉम’च्या प्रोसेसरमध्ये मोठी गडबड, 300 कोटीहून अधिक मोबाईल्सना हॅकिंगचा धोका

सहसा कोणत्याही प्रोसेसर किंवा चिपमध्ये बग असल्याचे समोर येत नाही, परंतु यावेळी क्वालकॉमच्या चिपमध्ये बग आल्याची बातमी आहे. या बगमुळे, जगभरात सुमारे 300 कोटीहून अधिक अँड्रॉइड स्मार्टफोनला सुरक्षिततेचा धोका आहे. सिंगापूरच्या एका एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे.

सुरक्षा (सिक्योरिटी) एजन्सी चेक पॉईंटने आपल्या अहवालात म्हटले आहे की, स्नॅपड्रॅगनच्या प्रोसेसरमध्ये डिजिटल सिग्नल प्रोसेसर म्हणजेच डीएसपीमध्ये एक बग आहे. हा बग अँड्रॉइड फोनमध्ये स्पायवेअर (गुप्तचर सॉफ्टवेअर) स्थापित (इंस्टॉल) करण्यास सक्षम आहे.

या बगमुळे गुगल, सॅमसंग, एलजी, झिओमी आणि वनप्लसचे कोट्यवधी फोन हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत.  गुगलच्या अहवालानुसार एप्रिल 2019 पर्यंत जगभरात 2.5 बिलियन अॅक्टिव अँड्रॉइड फोन आहेत.

अहवालात म्हटले आहे की, या बगचा फायदा घेऊन हॅकर्स यूजर्सच्या फोनमध्ये स्पायवेअर स्थापित ( (इंस्टॉल) करू शकतात. एकदा फोनमध्ये स्पायवेअर स्थापित( (इंस्टॉल) झाल्यानंतर हॅकर्स दूरस्थपणे कॉलिंग, संपर्क यादी(काॅन्टेक्ट लिस्ट), फोटो, स्थान (लोकेशन) आणि मायक्रोफोन डेटाबद्दल माहिती मिळवू शकतात.

क्वालकॉमलाही या बगबद्दल माहिती मिळाली आहे आणि ते निश्चित करण्याचे काम संबंधित टीमला देण्यात आले आहे. क्वालकॉमने शाओमी, एलजी, गुगल आणि सॅमसंग सारख्या विक्रेत्यांनाही या बगबद्दल माहिती दिली आहे. हा बग (दोष) एका अपडेटद्वारे निश्चित(फिक्स) केला जाईल, पण हे अपडेट केव्हा मिळेल याबदल क्वालकॉमने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.