भांबुर्डा वनउद्यान पुणेकरांसाठी खुले

पुणे – फळ उद्यान, बांबू वन, स्मृतीवन, नवग्रहांशी निगडित असणाऱ्या वनस्पती, नक्षत्रांशी निगडित असणाऱ्या वनस्पती अशा विविध संकल्पनांच्या आधारावर फुलविण्यात आलेले भांबुर्डा वनउद्यान आता पुणेकरांसाठी खुले झाले आहे. भांबुर्डा टेकडीच्या पायथ्याला 14 एकरमध्ये विस्तारलेले हे उद्यान म्हणजे पुण्याच्या पर्यावरणासाठी एक संजीवनी ठरणार आहे.

गोखलेनगरमधील मेंढी फार्मलगतच्या वनक्षेत्रात वनविभाग आणि आमदार विजय काळे यांच्या एकत्रित प्रयत्नातून भांबुर्डा वनउद्यान साकारले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी त्याचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी महापौर मुक्‍ता टिळक, आमदार विजय काळे, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते. विविध वनौषधी, सुंगधी वनस्पतींसह निसर्गाचे विविध पैलू उलगडणारे माहिती केंद्र, पर्यावरणविषयक चर्चांसाठी ओपन थिएटर, पावसाचे पाणी वाचवून केलेले तलाव अशी या उद्यानाची वैशिष्ट्ये आहेत. निसर्गाबद्दल जागृती करण्याच्या उद्देशानेच उद्यानाची रचना आणि संकल्पना निश्‍चित केली. भविष्यात स्थानिकांना व्यायामाची संधी मिळणार आहे, विद्यार्थ्यांसाठी निसर्ग सहली येथे आयोजित करून, त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक आपुलकी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.