लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्त्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते बीट हा लोह, जीवनसत्व, फॉलीक ऍसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे.
बीटरूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुध्द करतात. त्यात सापडलेल्या ऍटी ऑक्सिडेंट्स शरीराला रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात. त्याचबरोबर फॉस्फरस सोडियम, व्हिटॅमिन बी-1, बी-2 आणि व्हिटॅमिन सी हे सर्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. प्राचीन काळापासून बीटरूटचा वापर अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी केला जातो.
बीट हे उच्च रक्तदाब देखील नियंत्रित ठेवते. बीट दृष्टी सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलामधील फॉलीक ऍसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी कार्य करते. म्हणूनच आपल्या दैनंदिन आहारात बीटचा समावेश करण्याचा सल्ला देतात. बीटाचे कोशिंबीर आणि सुप बनविण्याव्यतिरिक्त सॅडविच, पराठामध्ये इतर भाज्यांबरोबर वापरले जाऊ शकते.
बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. बीटमध्ये असलेल्या नायट्रेटमुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हाय ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्या व्यक्तींनी बीट नेहमी खावे किंवा दररोज एक कप बीटचा रस प्यावा. बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते. त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. रक्त वाढीसाठी रोज सकाळी एक कप बीटचा रस प्यावा. बीट किंवा बीटच्या रसात कमी कॅलरीज असतात. तसेच 0% फॅट असते.
त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डायटमध्ये समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. कारण लो कॅलरीज असणाऱ्या बीट किंवा बीटच्या रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोह भरपूर असतात. बीट शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करतो. आपली हाडे आणि दात मजबूत होतात. मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि मासिक पाळी दरम्यान त्रास होत असेल तर कच्चे बीट आहारात समावेश करावा.
बीट खाताना किंवा बीट रस पिताना कोणती काळजी घ्यावी : जर लो बीपी असल्यास बीट किंवा बीट रस पीऊ नका, कारण एकाएकी रक्तदाब कमी होऊ शकतो.
डॉ आदिती पानसंबळ , आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.