अभिनेत्री करिना कपूर-खान सतत चर्चेत असते. तिचे लुक्स, कपडे यामुळे ती फॅशन आयकॉन मानली जाते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. यातच बेबो ने पुन्हा एकदा आई होणार आहे.
याबाबत सैफ अली खान – करीना कपूरने स्वत:ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
करीनाने २०१२मध्ये सैफ अली खानशी लग्न केले. त्यांनतर २०१६मध्ये तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर तैमुर सोशल मीडियावर सतत चर्चेत होता. आता करीना प्रेग्नंट असल्यामुळे अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.