सावधान…दिवाळीत मिठाई खाताय?

पुणे – दिवाळी म्हणजे फराळ, मिठाईचा आस्वाद घेणे आणि फटाके फोडणे. त्यामुळे या सणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतू, नागरिकांनो सावधान…! आपण खात असलेली मिठाई खरच आरोग्यासाठी चांगली आहे का, घातक ? कारण, वाढत्या मागणीमुळे मिठाईमध्ये आरोग्यासाठी हानीकारक असलेले कमी दर्जाचे पदार्थ वापरले जातात. तसेच मिठाई बनविण्याचे ठिकाणी अस्वच्छता पहायला मिळते. त्यामुळे मिठाई घेताना आणि विशेषत: खाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दिवाळीत मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडून हलक्‍या दर्जाचा खवा, रंग, साखर, पीठ वापरले जाते. तसेच ज्याठिकाणी ही मिठाई तयार केली जाते, तेथील परिसर अस्वच्छ असतो. कर्मचाऱ्यांचे वेळच्या वेळी आरोग्य तपासणी केलेली नसल्याचे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईमधून दिसून येते. दुकानदार आधीच मिठाई बॉक्‍स पॅकिंग करतात. मात्र, काही दिवसांत ही मिठाई खराब होते. त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो.

पोट, त्वचा विकाराचा धोका
बनावट खवा, रंग यापासून बनविलेली मिठाई खाल्ल्यामुळे पोटदुखी, डोकेदुखी, पित्त याचा त्रास होऊ शकतो. तसेच खराब तेल, डालडा यामुळे त्वचा, घशाचा त्रास होतो. सध्या मिठाईमध्ये खवा, डालडा आणि तेलाचा वापर अधिक होतो. काही व्यावसायिक “शुद्ध घी’ असे सांगून बनावट तुपाचा वापर करतात. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

गुजराती खव्यावर विशेष लक्ष
गतवर्षी पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळीमध्ये गुजराती खव्यावर कारवाई करून मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. यावेळी एफडीएची करडी नजर आहे. कमी दर्जाची मिठाई विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येण्यासाठी एफडीएच्या पथकाचे लक्ष असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.