जामखेड-जामखेडमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती गरिबांना किराणा वाटप करून साजरी जामखेड प्रतिनिधी दि शहरात आमदार सुरेश धस मिञ मंडळ व युवा नेते गणेश डोंगरे यांच्या मार्फत महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून लिंगायत समाज व समाजातील गोरगरिबांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून एकशे वीस कुटुंबियांना किराणा वाटप करून अगळेवेगळी जयंती साजरी करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षपासून जामखेड शहरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येते मात्र यावर्षी कोरोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे घरगुती प्रद्धतीने जयंती साजरी करण्यात आली दरम्यान सकाळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिवकुमार डोंगरे गिरीष काथवटे महेश कस्तुरे अनिल लोंखडे विजय डोंगरे राहुल लोहकरे अमोल लोहकरे युवानेते बंजरग सरडे आतुल बिडकर आदी उपस्थित होते.
शहरात हॉटस्पॉट असल्याने शहरातील कष्टकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने युवा नेते गणेश डोंगरे यांनी महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून लिंगायत समाज व इतर समाजातील गोरगरिबांना एकशे वीस कुटुंबियांना किराणा वाटप करून अगळेवेगळी जयंती साजरी करण्यात आली