मुंबई – बिग बॉस जिंकल्यानंतर बस्ती का हस्ती म्हणून ओळखणारा जाणारा ‘एमसी स्टॅन’ची लोकप्रियता दुप्पट झाली आहे. साडेचार महिने चाललेल्या या शोमधील एमसी स्टॅनची वेगळी शैली प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. हेच कारण होते की बिग बॉसमध्ये फारसे सक्रिय नसूनही चाहत्यांनी त्याची साथ सोडली नाही. आणि याच कारणामुळे एमसी स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
दरम्यान, घराबाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनचं सोशल मीडियावर अजुनही कौतूक होताना दिसतंय. सध्या तो वेगवेगळ्या शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे आणि दुसरीकडे अब्दू रोझिकसोबते त्याचे भांडण चव्हाट्यावर आले आहे. अब्दूच्या टीमने निवेदन जारी कर स्टॅनवर गंभीर आरोप केले आहेत. अश्यातच आता एमसी स्टॅनचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, ज्यात स्टॅन स्वत:वरील संयम गमावताना दिसला आणि तो चांगलाच ट्रोल झाला आहे.
Mc stan physical fight in an event. I have to say one thing he is humble guy that we know
But he is young .
Stan have to calm Patience ignore negativity …#HaqSeMandali #MCStanArmy #BiggBoss16 #MCStanConcert #AbduRozik pic.twitter.com/2fYWUWE4qv— Om agnihotri (@Omagnihotri7) March 22, 2023
गर्दीत तो कुणाला तरी मारायला धावतो पण त्याला तिथेच थांबवले जाते, असा हा व्हिडिओ आहे. रॅपरचे हे वागणे पाहून त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये स्टॅनच्या चेहऱ्यावरील राग स्पष्टपणे दिसून येत आहे. तो कोणाला तरी मारायला धावतो, तेव्हा आजुबाजूला गर्दीमध्ये असणारे लोक आणि सुरक्षा रक्षक त्याला थांबवतात. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत असून, अनेकांनी त्याच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.