बारामती (प्रतिनिधी) – एंडोक्राइन सोसायटी ऑफ इंडिया ए.व्ही. गांधी (Endocrine Society of India A.V.Gandhi Award for Excellence in Endocrinology) यांच्या मार्फत दिला जाणारा 2023 चा एन्डोक्रोनोलॉजी मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार नामांकनासाठी बारामतीचे डॉ. आदित्य देशपांडे यांची निवड झाली.
एन्डोक्रोनोलॉजी या आरोग्य विभागाच्या अगदी दुर्मिळ अशा शाखेमध्ये देशामधील काही निवडक डॉक्टर्स आपल्याला भारतामध्ये उपलब्ध आहेत. डायबिटीज (मधुमेह), थायरॉईड, लठ्ठपणा व इतर हॉर्मोन्सच्या समस्या अशा अनेक आजाराने त्रासलेल्या लोकांसाठी विविध संशोधन,
त्यावरील तपासण्या व त्यावरील उपचार पद्धती अशा सर्व गोष्टींमध्ये विशेष योगदान देणाऱ्या डॉक्टर्सना अशा पद्धतीचा हा पुरस्कार दिला जातो आणि यासाठी आपल्या बारामतीतील डॉ. कल्पना देशपांडे व डॉ. अशोक देशपांडे यांचे चिरंजीव डॉ. आदित्य देशपांडे यांची निवड झाली आहे.