पुणे – सप्टेंबर,27 रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या, पुणे येथील मुख्य कार्यालयात हिंदी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. एस. राजीव होते.
कार्यकारी संचालक हेमन्त टम्टा, कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार आणि महाव्यवस्थापक, संसाधन नियोजन विजय कांबळे उपस्थित होते. बॅंकेच्या गृह-पत्रिका महाबॅंक-प्रगतीच्या मोबाईल ऍपचे उद्घाटन करण्यात आले. विविध हिंदी स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.
राजीव म्हणाले की, व्यवसायाच्या वाढीमध्ये हिंदी आणि प्रादेशिक भाषांना महत्त्व असते. उपमहाव्यवस्थापक मृदुल जोगळेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. राजेन्द्र श्रीवास्तव, मुख्य व्यवस्थापक दिनेश गुप्ता, वरिष्ठ व्यवस्थापक हितेंद्रनाथ घोटेकर, निलेश कुमार, लोकप्रभा वाघे आणि मोनिका उंदीरवाडे यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.