मुंबई, दि. 15- बॅंक ऑफ बडोदाने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (बीआरएलएलआर) 6.85 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांवर आणला असून 15 मार्च 2021 पासून तो अंमलात येणार आहे.
सर्व रिटेल कर्जे बीआरएलएलआरशी (एक्सटर्नल बेंचमार्क- रेपो लिंक्ड रेट) निगडीत असून ग्राहकांना गृहकर्ज, मॉर्गेज कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर सर्व रिटेल कर्ज उत्पादनांवर लाभ घेता येणार आहे.
या बदलामुळे गृह कर्ज दर 6.75 टक्क्यांपासून, वाहन कर्ज 7 टक्क्यांपासून, मॉर्गेज कर्ज दर 7.95 टक्क्यपासून, शैक्षणिक कर्ज 6.75 टक्क्यापासून सुरू होईल. एमसीएलआर ते बीआरएलएलआरच्या व्याज दर रुपांतरणासाठी शाखेत संपर्काचे आवाहन ग्रहकांना करण्यात आले आहे.
बॅंकेच्या मॉर्गेज आणि तर रिटेल असेट्स विभागाचे व्यवस्थापक हर्षदकुमार टी. सोळंकी म्हणाले, बीआरएलएलआरमधील कपातीमुळे आमची कर्ज उत्पादने ग्राहकांना आणखी परवडण्यासारखी होणार आहेत. डिजिटल प्रक्रियेमुळे ग्राहकांना स्पर्धात्मक व्याज दरात जलद व सफाईदार पद्धतीने कर्ज घेता येणार आहे.