कोलकाता – पश्चिम बंगालच्या कोलकाता बांगलादेश दूतावासाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात स्कुटीवरून या परिसरातून जात असलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या सुरक्षा कर्मचाऱ्याने गोळीबार का केला, त्याचे कारण अद्याप समजले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोडूप लेपचा असे गोळीबार करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो दार्जिलिंगचा रहिवासी होता आणि आर्म्स पोलिसांच्या 5 व्या बटालियनमध्ये कार्यरत होता.
अचानक सुरक्षा कर्मचाऱ्यांने त्याच्या ऑटोमॅटिक रायफलने गोळीबार सुरू केला. त्याने किमान 8-10 राउंड फायर केले. यात स्कूटीवरुन जाणाऱ्या एका महिलेला गोळी लागली. यात तिचा मृत्यू झाला. यानंतर सुरक्षा जवानाने स्वत:वरही गोळी झाडली असे ही घटना प्रत्यक्ष बघितलेल्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले.