मुंबई – पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना भाजपने निलंबित केले आहे. यानंतर नुपूरने माफीही मागितली. पैगंबर मोहम्मद यांच्यावर वक्तव्याचे पडसाद भारतासह परदेशातही उमटले होते. आता याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहे.
आज नमाजानंतर दिल्लीपासून तेलंगाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालपर्यंत अनेक राज्यात मुस्लिम समाजाकडून तीव्र आंदोलने आणि निदर्शने कऱण्यात आली.
महाराष्ट्रातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालन्यात हजारोंच्या संख्येने मुस्लिम लोक रस्त्यावर आले. सोलापूरमध्ये देखील हीच स्थिती होती. तर अहमदनगर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. तर नवी मुंबई आणि पनवेलमध्येही शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
उत्तर प्रदेशात दगडफेक
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नमाजानंतर पोलिसांवर जोरदार दगडफेक झाली. पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.