BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. टीम इंडियासमोर कमकुवत वाटणाऱ्या बांगलादेशने पहिल्याच सामन्यात १ गडी राखून विजय मिळवला. सामन्यात शेवटच्या काही धावा शिल्लक असताना भारतीय संघाला फक्त एक गडी बाद करायचा होता. मात्र, गचाळ क्षेत्ररक्षणामुळे संघाला पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर या सामन्यातील पराभवासह भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सामन्यादरम्यान स्लो-ओव्हर रेटमुळे भारतीय संघाला दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता खेळाडूंना मॅच फीच्या ८० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
PAKvsENG । रावळपिंडीच्या कसोटीत इंग्लंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय
भारतीय संघ गोलंदाजीदरम्यान निर्धारित वेळेच्या ४ षटके मागे असल्याने आयसीसी सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी हा दंड ठोठावला. आयसीसीने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार खेळाडूंना स्लो ओव्हर रेटसाठी प्रत्येक षटकामागे त्यांच्या मॅच फीच्या २० टक्के दंड आकारला जातो. त्यामुळे भारतीय संघ निर्धारित वेळेपेक्षा ४ षटके मागे राहिल्याने हा दंड प्रत्येक खेळाडूसाठी ८० टक्क्यांवर गेला.
PAKvsENG । रावळपिंडीच्या कसोटीत इंग्लंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय
भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्लो-ओव्हर रेटबाबतची आपली चूक मान्य केली असून दंड मान्य केला आहे. त्यामुळे याबाबत औपचारिक सुनावणी करण्याची कोणतीही गरज नाही. भारतीय संघाला हा दंड मैदानावरील पंच मायकेल गफ, तनवीर अहमद, तिसरे पंच शरफुदौला इब्ने शाहिद आणि चौथे पंच गाझी सोहेल यांच्याकडून हा स्लो-ओव्हर रेटचा दंड लावण्यात आला आहे.
पहिल्या सामन्याबाबत माहिती
पहिल्या ( BAN vs IND ) एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. कागदावर मजबूत भासणार भारतीय संघ यजमान संघाच्या गोलंदाजीसमोर अवघ्या १८६ धावांवरच गारद झाला. केएल राहुलने एका बाजूने डाव सावरत ७३ धावांची खेळी केली. बांगलादेशच्या शाकिब अल हसन याने सर्वाधिक ५ गडी बाद केले. प्रत्यत्तरात भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनीही नांग्या टाकल्या, मात्र शेवटच्या क्षणी मेहदी हसन याने चिकाटीने फलंदाजी केली आणि त्याला भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणातील चुकांची साथ मिळाली. त्यामुळे बांगलादेशने या सामन्यात १ गडी राखून विजय मिळवला.